कॉग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादीला जोरदार धक्का…

सावंतवाडी : कॉंग्रेस पक्षानं मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पदवीधर सावंतवाडी शहराध्यक्ष रविंद्र चव्हाण यांन कॉंग्रेसचा हात धरला आहे. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत मंगेश बेळगांवकर यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपाध्यक्ष समीर वंजारी, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, संतोष मडगावकर, बबन डिसोझा, अमित डिसोझा आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page