पोखरबाव गणपती मंदिरातील फंडपेट्या चोरट्याने फोडल्या

रोख रक्कम लंपास : शुक्रवारी सायंकाळची घटना, पोलीस तपास सुरू

*⚡देवगड ता.२३-:* दाभोळे पोखरबाव येथील गणपती मंदिरातील फंडपेट्या फोडून अज्ञात चोरट्याने रु ४८५०/-एवढी रक्कम लंपास केल्याची फिर्याद मंदिराचे पुजारी विठ्ठल बाळकृष्ण राऊत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.सदरची घटना शुक्रवारी साय ७.३० ते शनिवारी स.५.४५ च्या मानाने घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवारी साय ७.३० च्या मानाने मंदिराचे पुजारी नेहमीप्रमाणे मंदिर दरवाजा बंद करून निघून गेले व दुसरे दिवशी सकाळी ते मंदिरात आले असता त्या मंदिरातील तीन फंडपेट्या तसेच अन्य दोन फंड पेट्या पैकी एक फंड पेटी अशा चार फंड पेट्या फोडलेल्या एक पूजा साहित्य पेटी अन्यत्र आढळून आली .या चोरीत मंदिराच्या फंड पेटीतील सुमारे ४८५०/- रु एवढी रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याचे निदर्शनास आले .त्यानुसार त्यांनी देवगड पोलीस स्थानक दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस नाईक महेंद्र महाडिक करीत आहेत.

You cannot copy content of this page