सावंतवाडी शहरात जिओ नेटवर्कचे जाळे पसरण्याची खोदाई

चांगल्या कामाचे भाजपकडून स्वागतच:-सत्यवान बांदेकर;कमिशनवर जगणाऱ्या भोगटे बदनामी करण्यासाठी टीका करीत आहेत

*⚡सावंतवाडी ता.२३-:* कोरोनाच्या काळात शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने केवळ नेटवर्क अभावी अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सद्य स्थितीत सावंतवाडीत जियो नेटवर्कचे जाळे सर्वदूर पसरविण्यासाठी काम सुरू आहे. याचे भाजप स्वागत करत असल्याचे मत भाजप शहर उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, जियो नेटवर्कचा सुरू असलेल्या चांगल्या कामाची नाहक बदनामी करण्यासाठी भोगटे टीका करत असून, कमिशनवर जगणाऱ्या भोगटे यांनी टीका करण्यापूर्वी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेला अंतर्गत विज वाहिनी प्रकल्प यांना कमिशन न मिळाल्यानेच होऊ शकला नाही. आणि त्यामुळे मंजूर झालेले 11 कोटी रुपये परत मागे गेले. असा आरोप बांदेकर यांनी यावेळी केला आहे. तसेच सुरेश भोगटे हे व्यापाऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यासाठी कोणते व्यापारी आहेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी जुन्या पोलिस स्टेशनच्या बाजूला असणारी टपरी कोणाची हे सुरेश भोगटे यांनी जाहीर करावे असे आवाहन देखील बांदेकर यांनी दिले आहे.

You cannot copy content of this page