देवगड तालुक्यातील एसटी प्रवासी फेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू करा

‘मविसे’ची आगार व्यवस्थापकांकडे मागणी : विद्यार्थ्यांची होते गैरसोय

*⚡देवगड ता.२३-:* कोरोना संक्रमण काळानंतर सद्यस्थितीत शैक्षणिक वर्ष चालू झाली आहेत. यात प्रामुख्याने २ सप्टेंबरपासून इयत्ता १०/१२ , ४ सप्टेंबरपासून ५ ते ९ /११ वर्ग शासनाच्या आदेशाप्रमाणे कोरोना नियम पाळून नियमितपणे सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे उच्च महाविद्यालय शिक्षण वर्ग देखील २० ऑक्टोबर पासून सुरू झाले आहेत. या अनुषंगाने एस टी प्रवासी फेऱ्या पूर्वीप्रमाणे नियमित व वेळेत सोडण्यात याव्यात .अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना देवगड तालुक्याच्या वतीने देवगड आगार व्यवस्थापक यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी देवगड स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांच्याकडे सादर केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, मनसे विभागीय अध्यक्ष अभिजीत तेली ,धीरज वाडेकर, मिहीर खडपकर ,प्रसाद सावंत हेमंत जाधव आदी उपस्थित होते. या निवेदनात या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत बंद असलेली एसटी सेवा सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालये शाळा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा कॉलेज यांच्या असणाऱ्या वेळा त्यांच्या वर्गवारीनुसार वेगवेगळे असल्याने आपल्या आगारातून सुटणाऱ्या प्रवासी फेऱ्यांचा वेळा व शाळा-कॉलेजच्या वेळांमध्ये काही ठिकाणी असमतोल पण आढळून येत असल्याने विद्यार्थी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तालुक्यातील शाळा व महाविद्यालय व्यवस्थापन यांच्याशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावी .व तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक या पूर्वी प्रमाणेच नियमित व वेळेत करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page