शिवसेना पदाधिकाऱ्यांची वीज कार्यालयावर धडक

लाके वस्तीमधील रहिवाशांचे वीज कनेक्शन तोडण्याबाबत विचारला जाब

सावंतवाडी : कोणतीही पूर्वकल्पना न देता शहरातील लाके वस्तीमधील रहिवाशांचे वीज कनेक्शन तोडल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले, एक महिन्याच्या मुदतीत टप्प्याटप्प्याने बिल भरणा करण्याची मुभा द्या, अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली असता ती मान्य करत वीज अधिकाऱ्यांनी कट केलेली वीज कनेक्शन पूर्ववत सुरू केली. यावेळी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा नगरपालिका गटनेत्या अनारोजीन लोबो यांच्यासह उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, संजय पेडणेकर, विशाल सावंत, महेश परुळेकर उपस्थित होते

You cannot copy content of this page