गोवा बनावट दारू विक्रीवर मालवण पोलिसांची कारवाई…

५ हजाराची दारू जप्त

मालवण (प्रतिनिधी) मालवण वायरी येथे गोवा बनावटीची दारू विक्री होत असल्याची माहिती मालवण पोलिसांना मिळाल्यानंतर काल रात्री वायरी येथील मुस्लिम मोहोल्ला येथे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या छाप्यात ५ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. मालवण वायरी येथील रोहन रजनीकांत पेंडूरकर (वय ३२) ही व्यक्ती गोवा बनावटीची दारू विकत असल्याची खबर मालवण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी काल बुधवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास वायरी मुस्लिम मोहोल्ला येथे दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी धडक देत छापा टाकला. या छाप्यात गोवा बनावटीची सुमारे ५ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस भारत फारणे, सिद्धेश चिपकर, दिलीप खोत, संतोष टेंबुलकर यांच्या पथकाने केली.

You cannot copy content of this page