गरजवंताना पाणलोटमधून डावलले

राष्ट्रवादीने विचारला उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना जाब

*⚡सावंतवाडी ता.२०-:* शासनाच्या पाणलोट योजनेची खरोखरच ज्या लाभार्थ्यांना गरज आहे . अशाच लाभार्थ्यांना डावलण्यात आल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उपविभागीय कार्यालय ला धडक देत जाब विचारला. यावेळी हा कारभार इन्सुली येथील एका संस्थेकडे असल्याचं उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांनी सांगितले याबाबत लाभार्थ्यांची यादी लवकरच मागून घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी अडसुळे यांच्याकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, इफतीगार राजगुरू, बावतिस फर्नांडिस, संजय भाईप, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page