असलदे येथे ‘आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘ विनामूल्य सेवा

*⚡कणकवली ता.२०-:* केंद्रशासनाच्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत पात्र लाभार्थी यांना आम. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून तसेच कणकवली सभापती मनोज रावराणे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे स्मार्ट कार्ड व माहिती अद्ययावत करून देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ असलदे ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला. असलदे गावात एकूण ५६७ लाभार्थी असल्याने या गावात स्वतंत्र शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमाला संदीप गुप्ता, महादेव शिराळकर , सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब , ग्रामसेवक आर.डी.सावंत ,जानू खरात , विव्ठल खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य सेवेशी निगडित असणाऱ्या या सेवेचा गावातील सर्व नागरिकांना विनामूल्य लाभ मिळणार आहे. तसेच ज्या ग्रामस्थांची नावे आयुष्यमान भारत योजनेच्या यादीत समाविष्ट आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सदर योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक स्मार्ट कार्ड अद्याप मिळालेले नाही, अशा ग्रामस्थांची देखील माहिती अद्ययावत करून त्यांना नव्याने सदर योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. गावातील नागरिकांनी असलदे ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page