*⚡कणकवली ता.२०-:* सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने साईबाबा सोशल क्लब, शाखा वागदे आयोजित जिल्हास्तरीय कॅरम टीम इव्हेंट स्पर्धा शनिवार दि. ३० ऑक्टोबर व रविवार ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी वागदे, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सांघिक खुला गट प्रकारात होणार आहे. सदर स्पर्धा अखिल भारतीय कॅरम संघटना वआंतर-राष्ट्रीय कॅरम संघटनेच्या प्रचलित नियमावली नुसार खेळविण्यात येणार आहे. या वर्षातील ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे सर्व खेळाडूंनी सन २०२१-२२ साठीची प्लेअर रजिस्ट्रेशन फी रू. ५०/- व . सांघिक स्पर्धेची एन्ट्री फी रू.५००/- असोसिएशनकडे जमा करावयाची आहे. इच्छुक संघांनी शुल्कासह आपले प्रवेश अर्ज बुधवार दि. २७ ऑक्टोबर 2021 पर्यंत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावेत. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रवेशिका विचारात घेतल्या जाणार नाहीत. सर्व खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव व असोसिएशनचा लोगो असलेला टी शर्ट आणि फूल पॅन्ट घालूनच सर्व सामने खेळायचे आहेत. कोव्हीड नियमावलीनुसार व्हॅक्सिनेशन किंवा ४८ तासातील कोव्हीड टेस्ट सर्व खेळाडूंना बंधनकारक राहील. स्पर्धेतील विजेत्यांना चषक व रोख रकमेची बक्षीसे देऊन गौरविण्यात येईल. व्हाईट व ब्लॅक स्लॅम साठी सुद्धा आयोजकांनी आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर काम पहाणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अवधूत भणगे व साईबाबा सोशल क्लबचे उत्तम वाळके यांनी केले आहे. स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी असोसिएशनचे सेक्रेटरी योगेश फणसळकर ( ९४२२६३३४०३ ) यांच्याशी संपर्क करावा.
वागदे येथे जिल्हास्तरीय कॅरम टीम इव्हेंट स्पर्धा
