28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यत कुंभार कला व महिला बचत गटाच्या दिवाळी फराळ प्रदर्शन आणि विक्री
*⚡कणकवली ता.२०-:* दिवाळी निमित्त कणकवली नगर पंचायतमार्फत दिवाळी बाजार संकल्पना राबविण्यात येणार आहे. युथ वेल्फेअर सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून कुंभार समाजाच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या मातीच्या पणत्या, भांडी, मातीचे आकाश कंदील यांचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी होणार आहे. तसेच कणकवली शहरातील बचत गटांचे विविध स्टॉल लावण्यात येणार असून या स्टॉलवर घरगुती फराळ, कागदी आकाश कंदील, आदी घरगुती वस्तू प्रदर्शन व विक्री 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यत हा बाजार असणार आहेत.28 रोजी सायंकाळी 5.30 वा या दिवाळी बाजाराचे उघाटन करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत समीर नलावडे बोलत होते यावेळी त्यांच्यासमवेत यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण, गटनेते संजय कामतेकर, अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड, ऍड. विराज भोसले, किशोर राणे, महेश सावंत, बंडू गांगण, अण्णा कोदे, युथ वेल्फेअरचे सचिव रुपेश घाडी, मनीष सागवेकर, सहसचिव रोफ काझी, विवेक ताम्हणकर आदी उपस्थित होते. समीर नलावडे म्हणाले,मुबई, गोवा येथे ज्या पद्धतीने बाजार भरविले जातात त्याच धर्तीवर हा बाजार असणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून बनविण्यात येणारा फराळ, मेणबत्ती, आकाश कंदील हस्तकलेतून साकारणाऱ्या वस्तुंना या बाजारात व्यासपीठ म्हणून हा उपक्रम राबवीण्यात येणार आहे. कुंभार समाजाची पारंपरिक कला असणाऱ्या माती कलेसाठी युथ वेल्फेअर सिंधुदुर्ग यांनी पुढाकार घेतला आहे. कणकवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या गणपतीच्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा बाजार भरविण्यात येणार आहे. या बाजारात कुंभार समाजासाठी 15 स्टॉल असणार आहेत. या ठिकाणी लाईट व्यवस्था नगरपचायत मार्फत करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. बचत गटांच्या स्टॉलवर घरगुती फराळ, कागदी आकाश कंदील, आदी घरगुती वस्तू प्रदर्शन व विक्री 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यत हा बाजार असणार आहेत. घरगुती बनविलेल्या दिवाळी साठीच्या वस्तूची विक्री येथे असणार आहे. याची ज जबाबदारी नगरसेविका मेघा गांगण यांच्यावर देण्यात आली आहे. बचतगटाच्या व कुंभार समाज कला प्रोत्साहन देण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन व विक्री असणार 28 रोजी सायंकाळी 5.30 वा या बाजाराचे उघाटन करण्यात येणार आहे. या सर्व विक्रेत्यांची स्टॉल ची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे. कुंभार समाज वस्तू करतात पण त्या मोठ्या शहरात विक्रीसाठी पाठवतात. त्याला येथे बाजारपेठ या माध्यमातून देण्यात येणार आहे. कुंभार समाज माती कामाचा लाईव्ह डेमो सुद्धा येथे पाहता येणार आहे. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी या उद्देशाने हे आयोजन केल्याचे सांगण्यात आले.
