सरस्वती मातेची मूर्ती दिली भेट तर दोन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी दिला धनादेश
*⚡मालवण ता.१९-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला माजी विद्यार्थी संघटने तर्फे सरस्वती पूजनाच्या दिवशी सरस्वती मातेची मूर्ती भेट देण्यात आली. तसेच महाविद्यालयातील दोन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी धनादेश महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. महाविद्यालयाला देण्यात आलेली सरस्वतीची मूर्ती ही माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य हेमंत रामाडे व ललित चव्हाण यांनी पुरस्कृत केली होती. या मूर्तीचे महाविद्यालयात पूजन करण्यात आले. तर महाविद्यालयातील दोन गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी माजी विद्यार्थी संघटने तर्फे रुपये ५ हजारचा धनादेश महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, सचिव अमेय देसाई, खजिनदार प्रदीप नाईक साटम, माजी विद्यार्थी हेमंत रामाडे, ललित चव्हाण, प्रा. आर. एन. काटकर, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. कैलास राबते, प्रा. एच. एम. चौगले, प्रा. एम. आर. खोत, प्रा. हसन खान, प्रा. बर्वे, प्रा. अन्वेषा कदम, प्रा. मिलन सामंत, प्रा. खोबरे, ग्रंथपाल श्री. पवार, प्रमोद गोसावी आदी व इतर उपस्थित होते.
