देवगड समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ट्रोलर्सवर मत्स्य विभागाची कारवाई

देवगड देवगड समुद्रासमोर १५ वाव पाण्यात महाराष्ट्र जलधी प्रतिबंध क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून मासेमारी करणार्‍या कर्नाटक येथील ‘स्वर्णहनुमा’ व ‘फोरस्टार’ या ट्रॉलर्सवर देवगड मlस्य विभागाच्यावतीने मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मत्स्य परवाना अधिकारी रवीद्र मालवणकर यांच्यासमवेत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक प्रथमेश चव्हाण, सागरी सुरक्षा रक्षक हरेशवर खवळे, धाकोजी खवळे, योगेश फाटक, अमित बांदकर, श्री. ठुकरुल सहभागी झाले होते. पकडण्यात आलेल्या या बोटीवर गळ फिशिंगची जाळी आढळून आली. तसेच बोटीवरील खलाशांचा विमा नव्हता. तसेच या बोटींना महाराष्ट्र जलधी प्रतिबंध क्षेत्रात मासेमारीचा परवाना नसताना या बोटी अनधिकृत प्रवेश करून मासेमारी करीत असताना मत्स्य विभागाच्या गस्तीनौकेने पकडले. या बोटाRवरील मिळालेल्या मासळीची लिलाव प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. बुधवारी या बोटीवर कारवाई करण्यासंदर्भातअभिनिर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती श्री. मालवणकर यांनी दिली. फोटो

You cannot copy content of this page