बेकायदा दारू वाहतूक कारवाईत ९ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त

*⚡बांदा ता.१९-:* गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्या मार्गे बेकायदेशीर रित्या छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभाग कोल्हापूर यांनी कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत बेकायदेशीर रित्या गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या स्विफ्ट चारचाकीवर (एमएच ०४ डीएन ७८५४) धडक कारवाई करत एकूण ६ लाख ४४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी कोंडुरा गावाच्या हद्दीत कोंडुरं ते निरवडे या मार्गावर करण्यात आली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या दारूचे एकूण ५० बॉक्स जप्त करण्यात आले असून, गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर (रा. वेंगुर्ला) याला ताब्यात घेण्यात आले असून कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या कारवाईत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिंचवड येथे गोवा बनावटिची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चारचाकी (एमएच ०१ व्हीए ५७४५) मधून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या दारुचे ३ लाख ८ हजार ७६० असे एकूण १५ बॉक्स तसेच वापरण्यात आलेले चारचाकी असे एकूण ९ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी सुजय कन्हेया छेडा (गांधीनगर, कोल्हापूर) आणि शंकर विष्णुमल वाणी (कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोल्हापूर विभाग कोल्हापूर या पथकाने मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यशवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी.आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर.जी. येवलुजे व के.डी. कोळी तसेच जवान सर्वश्री सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दिपक कापसे यांनी केली. पुढील तपास आर.जी. येवलुजे दुय्यम निरीक्षक व पी.आर. पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर हे करीत आहेत.

You cannot copy content of this page