*⚡सावंतवाडी ता.२०-:* कारीवडे गावचे रहिवासी माजी सैनिक तथा माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते बाबी भाऊ जाधव ( वय ७४) यांचे काल दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर अंतिम संस्कार विधी आज २० ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता कारीवडे येथे होणार आहे. बामसेफचे जिल्हा अध्यक्ष तथा वर्देशाळा नंबर १ चे मुख्याध्यापक भालचंद्र जाधव, पु.प्रा. शाळा नंबर ४ सावंतवाडीचे मुख्याध्यापक केशव जाधव, सावंतवाडी एस.टी. आगाराचे वाहक कर्मचारी अनिल जाधव यांचे ते वडील होते. तर सिंधुदुर्ग पोलिस हवालदार विश्रांती (शिल्पा) जाधव यांचे ते सासरे होते.
कारीवडे येथील माजी सैनिक बाबी जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन
