माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी व्यक्त केला आशावाद
वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील व एकूणच आंबेडकरी चळवळीचा इतिहास, वर्तमान व भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी वैभवपर्व या ञैमासिकाची निर्मिती करण्यात आली आहे.यातून तालुक्यातील तरुण मुलामुलींना लिहीण्याची प्रेरणा मिळणार असून त्यांना हक्काच व्यासपीठ या माध्यमातून मिळाले आहे. लिहीण्यासाठी त्यांना वाचन करावे लागेल या प्रक्रीयेतून युवकवर्ग प्रगल्ब होईल तेव्हाच ख- या अर्थाने डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाजनिर्माण होईल.असा आशावाद माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांनी व्यक्त केला आहे. वैभववाडी तालुका बौध्दसेवा संघ वमाता रमाई महीला मंडळ यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे ६५ वा. धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या दिनाचे औचित्य साधून वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ पुरस्कृत ‘ वैभवपर्व’ या डिजीटल ञैमासिकाच्या पहील्या अंकाचे प्रकाशन सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, गट शिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते आॕनलाईन पध्दतीने करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी समाज कल्याण सभापती कांबळे बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे उपाध्यक्ष संतोष कदम होते.तर सरचिटणीस रविंद्र पवार, वैभवपर्व ञैमासिकाचे संपादक प्रफुल्ल जाधव, सेवानिवृत्त तहसिलदार भास्कर जाधव, आदी उपस्थितीत होते. यावेळी प्रथम ञिसरणं पंचशिल व विधी संचलन संघाचे बौध्दउपासक सुरेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली संतोष कदम, महेश पेडणेकर, मंगेश कांबळे, अमर कदम, श्रीपत कुसूरकर यांनी केले.यावेळी लोरे येथील एका कुटुंबाने बौध्द धम्माची दिक्षा घेतली.कार्यक्रमाची सुरुवात सहसचिव शरद कांबळे यांनी गायलेल्या क्रांतीकारी गीताने करण्यात आली. यावेळी बोलताना गटशिक्षण अधिकारी शिंनगारे, सहाय्यक गटविकास अधिकारी भरसट, बुध्द धम्म अभ्यासक मिलींद सर्पे यांनी संघाच्या कामाचे कौतुक करीत डिजिटल ञैमासिकाचा आढावा घेतला व हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले. लिहीत्या हातांना प्रेरणा देणारा हा उपक्रम वाचन संस्कृती वृध्दींगत करणार आहे.यातून नवीन विचारांची क्रांती निर्माण होईल.असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच आजच्या तरूणाईच लेखन अव्वल दर्जेदार आहे.समाजात अपेक्षित बदल घडवण्याची ताकद ह्या विचारांत – लेखणीत आहे. कुणाच्याही प्रभावाखाली दडपून न जाता ते त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार घडवत आहेत. नव्याने लिहिणाऱ्यांची, बोलणाऱ्यांची एक मोठी फळी आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे.एव्हाना होत आहे . विविध समाज माध्यमांद्वारे सातत्याने व्यक्त होणाऱ्या तरूणाईला थोडी सम्यक दिशा दिली तर नेमके समाज परिवर्तनीय कवडसे गवसु शकतात.हा विश्वास कायम मनी आहे..ह्याच प्रामाणिक हेतू आहे.वभवपर्वची सुरुवात करीत असल्याचे वैभवपर्वची भूमिका मांडताना रुपेश कांबळे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष कदम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला तर पहिल्या सञात सहसचिव मारुती कांबळे यांनी धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रविंद्र पवार, सूञसंचलन वैभवपर्वचे सहसंपादक प्रतिक पवार, स्वागत दीपाली जाधव,तर मासिकामागची भूमिका संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख रुपेश कांबळे यांनी मांडली. आभार प्रश्नांत कदम यांनी मानले. यावेळी महिला मंडळाच्या मोहीनी कांबळे प्रमोद जाधव,संजय जंगम, चंद्रकांत जाधव,अजित कदम, धर्मरक्षित जाधव, उदय जाधव,पिंट्या कांबळे, धोंडीराम तांबे,राजेंद्र पवार, स्नेहशिष कदम आदींसह बौद्धबांधव व भगिनीं उपस्थित होते. फोटो- वैभवपर्व ञैमासिकाचे प्रकाशन करतांना समाजकल्याण सभापती शारदा कांबळे , सोबत शशिकांत भरसट, मुकुंद शिनगारे, रविंद्र पवार, प्रफुल्ल जाधव, संतोष कदम, मिलिंद सर्पे व भास्कर जाधव.
