*⚡वैभववाडी ता.१४-:* दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ वैभववाडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुर्गामाता उत्सव मंडळ, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान व जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, माजी अध्यक्ष शांताराम रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, उपसभापती अरविंद रावराणे, डॉक्टर उपाध्ये जीवनधरा ब्लड बँक कोल्हापूर प्रतिनिधी डॉ. उपाध्ये, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश पडवळ, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, सचिव संजय रावराणे, उपाध्यक्ष संजय सावंत, मनोज सावंत, अविनाश साळुंखे, गणेश मसुरकर, सुनील भोगले, तेजस आंबेकर, संतोष कुडाळकर, सुरेंद्र नारकर, प्रथमेश रावराणे, संतोष रावराणे, शैलेंद्र परब, गंगाधर केळकर व सदस्य उपस्थित होते. वैभववाडी येथे दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. दरदिवशी पुजा, आरती व धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.
वैभववाडीत दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद
