मळगाव बाजारपेठेतील मॉडर्न बेकरी आगीच्या भक्ष्यस्थानी

आगीत लाखो रुपयांचे नुकसान : मात्र जिवीतहानी टळली

*⚡सावंतवाडी ता.१४-:* मळगाव बाजारपेठेत दत्तमंदिर लगत असलेल्या मॉडर्न बेकरीला आज पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीत बेकरी जळून भस्मसात झाली. या अग्नितांडवात बेकरीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतेही कर्मचारी नसल्याने जीवितहानी मात्र टळली. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. लगतच्या काही दुकानांना आगीची काही प्रमाणात झळ बसली मात्र मोठे नुकसान झाले नाही. मात्र मॉडर्न बेकरीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दुकाने नसल्यानेही मोठी हानी टळली. आगीची माहिती देताच सावंतवाडी नगरपालिका व कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले.

You cannot copy content of this page