वाद कसे मिटवायचे यावर देवगड बसस्थानक वर जनजागृतीवर पथनाट्य सादर

*⚡देवगड ता.१३-:* देवगड तालुका विधी समिती,व देवगड तालुका वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने” आझादी का अमृत महोत्सव “या निमित्ताने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम अंतर्गत’ मध्यस्थी’मार्फत तंटे वाद कसे मिटविले जातात याची जनजागृती देवगड बसस्थानक वर पथनाट्यद्वारे नागरिकांसमोर करण्यात आली. २ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत प्राधिकरण विधी सेवा समिती दिल्ली ,महाराष्ट्र प्राधिकरण विधी सेवा समिती यांचे आदेशाने जिल्हा व तालुका विधी सेवा समिती प्राधिकरण यांचे सहकार्याने देवगड चे दिवाणी न्यायाधीश बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने बुधवारी सकाळी देवगड बसस्थांनकवर ‘मध्यस्थी’ म्हणजे एक तटस्थ व्यक्ती म्हणजे मध्यस्थ,दोन्ही पक्षकारांमध्ये असणारा वाद परस्पर संमतीने सोडविण्यासाठी मदत करतो .या मार्फत गाव पातळीवरील वाद कसे सोडविता येतात .व यात वेळ पैसा याची बचत होते व वाद अथवा तंटे मिटतात .याची परिपूर्ण माहिती विविध टप्प्यावर पथनाट्य द्वारे नागरिक महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे समोर देण्यात आली.तसेच विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहितीही उपस्थित नागरिकांना देण्यात आली. या पथनाट्य मध्ये देवगड दिवाणी न्यायालयाचे सहा. अधीक्षक ए.पी.गोसावी,दत्तात्रय गद्रे,ज्योती तेंडुलकर,मनोज रसाळ,बुद्धिराज आचरेकर,तृप्ती तारकर,देवगड सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण होमगार्ड अधिकार मंगेश जाधव,प.स.चे विनायक धुरी यांनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page