२९ नारळांना २८९० रुपये बोली : ज्ञानदिपप्रासादिक भजन मंडळाची अनोखी परंपरा
*⚡बांदा ता.१२-:* होय..!हे खरं आहे. सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस या गावी एका नारळाला ४०९० एवढी किंमत मिळाली आहे. भजनातील नारळांचा लिलाव (पावनी) करून ते पैसे पुन्हा मंडळाला देण्याची अनोखी परंपरा पाडलोस मध्ये सुरू आहे. दरम्यान करण्यात आलेल्या लिलावात एक नारळाला ४०९० रुपये किंमत मिळाली. दरवर्षी गणपतीमध्ये गावागावात प्रत्येक वाडीची भजन मंडळे भजने सादर करत असतात. त्यावेळी विडा म्हणून बिदागी बरोबरच नारळ दिले जातात. या संपूर्ण दिवसात बरेच नारळ जमा होतात. या नारळांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा पाडलोस गावातील बामनवाडीतील “ज्ञानदिपप्रासादिक भजन मंडळ, बामनवाडी” या मंडळाने त्या नारळांचा लिलाव (पावनी) करून येईल ती रक्कम मंडळात जमा करण्याचे ठरवले आणि एक नवीन प्रथा बऱ्याच वर्षापासून चालू केली. गेली कित्येक वर्षे ही पद्धत चालू आहे. या वर्षीही हा लिलाव करण्यात आला त्यात एका नारळाची बोली चक्क ४०९० रूपये एवढी लावण्यात आली आणि ही बोली महेश सुभाष गावडे यांनी जिंकली. ईतर २९ नारळांना २८९० रुपये बोली लागली. सगळीकडे महेश यांचे कौतुक करण्यात येत आहे. सर्व रक्कम मंडळाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
