व्यवसायिकांना दादागिरी करून दुकाने बंद करण्याचा निंदनीय

मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांचा टोला

*⚡मालवण ता.११-:* उत्तर प्रदेश लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्यावतीने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. मात्र या बंदला कोणताही प्रतिसाद लाभला नाही. मालवणात तर आठवडा बाजारही भरला होता. गोरगरीब व्यवसायाईक बाजारासाठी आले होते. या व्यवसायिकांना दादागिरी करून दुकाने बंद करण्याचा प्रकार शिवसेनेने केला. हा प्रकार निंदनीय आहे. अशी भूमिका मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी मांडली आहे. उत्तरप्रदेश येथे शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. आम्हीही या घटनेबाबत दुःख व्यक्त करतो. मात्र त्या घटनेचे राजकारण कोणी करत असेल तर ते दुर्दैवी म्हणावे लागेल. शिवसेनेचे पदाधिकारी यांनी दादागिरी करून दुकाने बंद केली. या घटनेचा आम्ही निषेध करतो. कोरोना लॉकडाऊन काळात व्यापारी वर्ग भरडला. त्याला उभारी देण्याचे बळ देण्याचे अथवा लाईटबिल दाखवण्याचे सौजन्य या सरकारने दाखवले नाही. मात्र स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जर यापुढे दडपशाही सुरू ठेवली तर ती सहन केली जाणार नाही. असा इशारा विनोद सांडव यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page