असलदेत शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप

इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण

*⚡कणकवली ता.११-:* कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्व निधीतून 50 टक्के रक्कम भरून घेत येथील जवळपास 90 शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप करण्यात आले आहे.1260 रुपये किंमतीची ताडपत्री 630 रुपये भरणा करुन शेतकरी वर्गाला उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी गेल्या मार्च महिन्यात झालेल्या इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले आहे. यावेळी कणकवली तालुक्याचे सभापती मनोज रावराणे, जि. प. सदस्य संजय देसाई, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,असलदे सरपंच पंढरी वायंगणकर , उपसरपंच संतोष परब, सोसायटी चेअरमन प्रकाश परब, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबाजी शिंदे , ग्रामसेवक आर.डी.सावंत, पोलीस पाटील सावित्री पाताडे, जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग चे रमेश खरात , इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षक शशिकांत मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आशा सेविका, व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जि. प. सदस्य संजय देसाई यांनी जि.प.च्या विविध प्रकारच्या योजनेची माहिती देवून अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तर सभापती मनोज रावराणे यांनी बोलताना सांगितले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्व निधीतून ताडपत्री वाटप कार्यक्रम कणकवली तालुक्यात पहीलाच होत असल्याने ग्रामपंचायत असलदे सरपंच व पूर्ण टिम ची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे सांगितले आहे.तसेच इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण घेतलेल्या युवकांनी आपण घेतलेल्या कौशल्य प्रशिक्षण चा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी यासाठी आपण करत असलेल्या कामाचा सोशल मीडिया च्या माध्यमातून नेटवर्क तयार केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी असलदे ग्रामपंचायतीचे कौतुक करुन तालूक्यात पहीलीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वनिधीतून ताडपत्री वाटप करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. यामुळे सर्व ग्रामपंचायत सर्व टिमचे अभिनंदन केले आहे.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर,प्रास्ताविक ग्रामसेवक आर.डी . सावंत तर आभार सरपंच पंढरी वायंगणकर यांनी मानले आहे.

You cannot copy content of this page