बेकरी मालक व कार्यकर्त्यांध्ये झाली बाचाबाची
*⚡कणकवली ता.११-:* उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, कणकवली शहरात या बंदला दुकानादारांनी ठेंगा दाखविला. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे कणकवली शहरात निषेध रॅली काढली. यावेळी आमदार वैभव नाईक व कार्यकर्त्यांनी शिवसेना स्टाईलने भाईगिरी करत पटवर्धन चौकातील एका बेकरीचे शटर स्वतःबंद केले.यावेळी बेकरी मालक व कार्यकर्त्यांध्ये शाब्दीक खटके देखील उडाले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.मात्र या घटने नंतर कणकवली शहरातील बाहेरील व्यपाऱ्यानी काही काळ आपली दुकाने बंद केली.मात्र आम.नाईक व महाविकस आघाडीचे पदाधिकारी बाजारात न फिरता हायवेवरूनच माघार घेत शिवसेना कार्यलाया समोरील देवी जवळ या मोर्चाची सांगता केली.या घटनेमुळे कणकवलीत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
