प्रा . महेंद्र नाटेकर यांनी मांडली यु ट्युबवर स्वतंत्र राज्याची संकल्पना

*⚡कणकवली ता.१०-:* स्वतंत्र कोकण राज्यासाठी गेल्या दोन तपाहून अधिक काळ सातत्याने संघर्ष करणारे या संकल्पनेचे प्रणेते प्रा . महेंद्र नाटेकर यांनी ‘ युट्युब ‘ च्या माध्यमातून आपली संकल्पना जनतेसमोर मांडली आहे . ‘ स्वतंत्र कोकण राज्य , काळाची हाक ‘ या शीर्षकाचा १८ मिनिटांचा व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहे . Bit . Ly / KokanRajya या लिंकवर इच्छुकांना तो पाहता येईल . कोकण प्रदेश हा वैशिष्ट्यपूर्ण असून नैसर्गिक साधन सामग्रीने संपूर्ण राज्यात समृध्द आहे . मात्र ज्या गतीने विकसित झाला तसा कोकणात झाला नाही . याला कोकणातील लोकप्रतिनिधी , अन्याय सहन करणारी जनता जबाबदार आहे . कोकणचा सर्वसमावेशक विकास करायचा असेल तर कोकण स्वतंत्र राज्य झालेच पाहिजे , या संदर्भातील आपली भूमिका प्रा . नाटेकर यांनी या व्हिडिओमधून मांडली आहे . स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी विविध आंदोलनाद्वारे ही मागणी लावून धरली आहे .

You cannot copy content of this page