सावंतवाडी शहरातील राजकारणातील प्रभावी महिला शक्ती

वडिलांकडून देशसेवेचे बाळकडू मिळालेल्या नगरसेविका दीपाली भालेकर यांना मिळाली पतीच्या समाजकार्याची जोड;अल्पावधीत ठरल्या राजकारणात ठसा उमटविणाऱ्या स्त्री शक्ती

*⚡सावंतवाडी ता.१०-:* शहरातील राजकारणातील एक अग्रण्य महिला म्हणजेच सावंतवाडीच्या नगरसेविका सौ दिपाली भालेकर. वडील सैनिक असल्याने देशसेवेचे बाळकडू लहानपणापासून त्यांना मिळाले होते. पती दिलीप भालेकर हे कॉलेज जीवनापासूनच समाज कार्यात अग्रेसर होते. त्यामुळे त्यांना देखील समाज कार्याची संधी मिळाली. परंतु, अनेकांच्या समस्या सोडवताना त्यांना अडचणी येऊ लागल्या. यातच पती २५ वर्षाहून जास्त काळ सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांना २०१६ साली नगरपालिका निवडणुकीचे तिकीट मिळाले. सर्व सामान्य जनतेची सेवा करण्याची एक नामी संधी त्यांच्याकडे चालून आली होती. आणि त्यांनी या संधीचे सोने करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा वापर करत आपल्या प्रभागात विकास कामे करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रभागातील जिल्हा परिषद शाळा नंबर ६ मध्ये अंगणवाडी सुरू केली. याच शाळेच्या दुरुस्तीसाठी त्यानी पाठपुरावा करून जिल्हा परिषद कडून १० लाखाची तरतूद करून घेतली. प्रभागात करत असलेल्या विकासात्मक कामामुळे आज त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या ओंकार मॅचिंग सेंटर च्या माध्यमातून अनेक मुलींना शिवणकलेचे धडे देत असून, १० हुन जास्त महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोरोना काळात देखील त्यांनी १२६ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूं उपलब्ध करून दिल्या. आपल्या राजकीय पदाचा वापर त्यानी नेहमी सर्वसामान्य जनतेच्या विकासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केला आहे. राजकारणातील अश्या प्रामाणिक स्त्री शक्तीला ग्लोबल महाराष्ट्र कडून प्रणाम…

राजकारणात काम करत असताना त्यांनी जिल्हा परिषद शाळा नंबर ६ च्या शिक्षक पालक संघात उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. तसेच गुरुकृपा बचत गटाची देखील उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. तसेच संत गाडगेबाबा महिला बचत गट आणि नवलाई बचत गटात अध्यक्ष म्हणून काम करत असून, महिलांना वेळोवेळी मदत करत आहेत. त्यानी आपल्या प्रभागात केंद्रीय मंत्री नारायण राणे व नगरपालिकेच्या माध्यमातून अडीच ते तीन कोटींची कामे केली आहेत.

You cannot copy content of this page