ओव्हरलोड खडीची वाहतूक करणाऱ्या सात डंपरवर कारवाई

महसूल मंडळाच्या पथकाने केली कारवाई

*⚡बांदा ता.०८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात ओव्हरलोड खडीची वाहतूक करणाऱ्या ७ डंपरवर बांदा येथे महसूल मंडळाच्या पथकाने कारवाई केली. येथील श्री साई समर्थ डंपर चालक-मालक संघटनेने केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. बांदा सटमटवाडी महामार्गावर टोलनाका येथे नायब तहसीलदार मनोज मुसळे, महसूल मंडळ अधिकारी आर वाय राणे, बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या डंपर चालकांकडे २ ब्रास खडी वाहतुकीचा परवाना होता, मात्र महसूल पथकाने तपासणी केल्यानंतर डंपर मध्ये ४ ब्रास खडी आढळली. त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीची कारवाई करण्यात आली. कारवाईच्या भीतीने काहि डंपर चालकांनी डंपर तेथेच टाकून पळ काढला. कारवाई करण्यात आलेले सर्व ओव्हरलोड डंपर पुढील कारवाईसाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नेण्यात आले.

You cannot copy content of this page