*⚡कणकवली ता.०८-:* मालवण तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर 1 या शाळेमध्ये विविध कार्यकारी सोसायटी श्रावणचे चेअरमन विनू कुबल यांनी सर्व विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून उकडलेली अंडी वाटप केली आहेत. अंड्यांचे वाटप करताना देणगीदार विनू कुबल, केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, शाळेचे मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, रागिनी ठाकूर, सचिन घोटाळे, पोषण आहाराच्या काकू रोहिणी पवार, सुवर्णा दळवी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विनू कुबल यांचे शाळेच्यावतीने केंद्रप्रमुख नितीन कदम यांनी स्वागत करून आभार मानले.
विनू कुबल यांच्याकडून श्रावण शाळेतील विद्यार्थ्यांना अंडी वाटप
