विकास कामाला विरोध हा उपनगराध्यक्ष वराडकर यांचा एकमेव कार्यक्रम

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

*⚡मालवण ता.०७-:* मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर याना आपल्या पदाच्या कर्तव्याचा विसर पडला आहे. मागील पाच वर्षात उपनगराध्यक्ष वराडकर यांनी मालवणच्या जनतेसाठी एक तरी विधायक काम केले असेल तर दाखवावे. फक्त विकास कामाला विरोध हा एकमेव कार्यक्रम वराडकर त्यांनी सुरु ठेवलेला आहे, अशी टीका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे. मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर केलेल्या टीकेला नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून प्रत्युत्तर दिले आहे. नगराध्यक्ष पदानंतर महत्वाचे पद असताना उपनगराध्यक्ष वराडकर हे न.प.मधे कुठल्यातरी पक्षाचे प्रवक्ता असल्या सारखे फक्त पत्रकार परिषद घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यानी ते कुठल्या पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेतात ते एकदा जाहिर करावे. कारण आज पर्यंत ज्या पक्षातुन निवडून येतात त्यांच्या विरुद्ध काम करतात हा त्यांचा इतिहास आहे. मागच्या टर्मला राष्ट्रवादीतून निवडून येवून स्वार्थासाठी काँग्रेसला मदत, या टर्मला शिवसेना भाजपा मधून निवडून येवून विरुद्ध काम केले. फक्त निवडून येण्या पुरता पक्षाचा उपयोग करायचा आणि निवडून आल्या नंतर स्वयंघोषित नेते असल्या प्रमाणे काम करायचे ही वराडकर यांची वृत्ती आहे, अशी टीका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे. दांडी येथील लागलेल्या आगीच्या ठिकाणी स्वतः न जाता, त्यांच्यासाठी कुठलीही मदत न करता, नगरपालिकेला या आगीबाबत कुठलीही माहिती न देता त्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या मुद्द्याचे राजकीय भांडवल करण्याचा घृणास्पद प्रकार वराडकर हे करत आहेत. मालवणसाठी अद्ययावत अशी फायर फाइटर गाड़ीचा प्रस्ताव अंतिम स्तरावर शासन स्तरावर मंजूरी साठी आहे. नागरिकांची एवढी काळजी असल्याचे दाखविणाऱ्या वराडकर यांनी हा प्रस्ताव मंजूरी साठी काय प्रयत्न केले ते पण सांगावे. विकास कामासाठी मागच्या पाच वर्षात एकदा तरी वराडकर मंत्रालयात गेले आहेत का ते जाहिर करावे, असेही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी म्हटले आहे. अत्याधुनिक स्विमिंग पूल कामाचे श्रेय आम्हाला मिळेल म्हणून स्वखर्चाने स्विमिंग पूल बांधून देणाऱ्याला पळवून लावण्यात आले. तो कोणाच्या त्रासाला आणि कुठल्या कारणाला कंटाळून पळून गेला हे सर्वाना माहिती आहे. याच ठिकाणी होणाऱ्या बैडमिंटन हॉल होण्यासाठी वराडकर आणि कुशे यानी ठराव घातला होता. पण टेंडर कमी दराने गेल्या नंतर ते काम बंद पाडण्यासाठी वराडकर सतत कार्यरत आहेत याचे कारण समजणे एवढी जनता हुशार आहे. स्वतः पाणी पुरवठा सभापती असताना मालवणसाठी होणाऱ्या नवीन नळपाणी योजनेच्या ठरावाला वराडकर यांच्या पक्षाचे सहकारी सहकार्य करत असताना वराडकर विरोधी मत देतात, यावरून मालवणच्या जनतेची वराडकर यांना किती काळजी आहे ते दिसून आलेले आहे. आपले अपयश लपवण्यासाठी वरडकर यांनी खाऊन पिऊन केलेली उपोषण मालवण वासियानी अनुभवली आहेत. राजकीय स्वार्थासाठी वराडकर यांनी जनतेला वेठीस धरलेले आहे. आम्ही आमची जबाबदारी टाळत नाही. पहिली तीन वर्ष स्वच्छतेचे काम पण चांगले केले आहे. परंतु त्या नंतर आलेल्या कोविड़ महामारीत कामगारांची अडचण, कचरा गाड़ी नादुरुस्त यामुळे अडचण आली होती. पण ती दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही सर्व जबाबदारी ही नगराध्यक्ष म्हणून माझी आहे पण नगरसेवक म्हणून वराडकर यांचीही आहे हे ते विसरले आहेत, असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page