कणकवली नगरपंचायतमध्ये 8 व 12 ऑक्‍टोबर रोजी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

*⚡कणकवली ता.०७-:* कणकवली शहरातील18 वर्षावरील नागरिकांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस पूर्ण व्हावा या दृष्टीने 8 व 12 ऑक्‍टोबर रोजी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कणकवली नगरपंचायत च्या बहुउद्देशीय हॉलमध्ये लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मुख्य अधिकारी अवधुत तावडे यांनी दिली. ज्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर येता येत नसेल त्यांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी 7 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत याबाबत सूचना दिल्या आहेत. या दोन दिवस लसीकरण मोहिमेत कणकवलीतील नागरिकांनी सहभाग घ्या व कणकवलीतील नगरसेवकांनी देखील याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन तावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page