पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा…

भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांचे आवाहन

वैभववाडी प्रतिनिधी असंघटित कामगारांना आधार मिळावा यासाठी केंद्र शासनाने ई- श्रम कार्ड ही योजना राबविली आहे. या योजनेचा फायदा समाजातील शेवटच्या घटकाला देखील होणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. वैभववाडी राजापूर अर्बन बँक येथील सभागृहात आयोजित ई-श्रम कार्ड योजनेचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पार पडला. प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुभारंभ प्रसंगी वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष महेश संसारे, संचालक प्रमोद रावराणे, उत्तम सुतार, राजू पवार, किशोर दळवी व तालुक्यातील असंघटीत महिला कामगार उपस्थित होते. माधव भंडारी म्हणाले, मोदीजींना 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात 50 वर्षे काम केले आहे. तर प्रशासकीय क्षेत्रात 21 वर्षे काम केले आहे. गेली 7 वर्षे ते देशाच्या पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत. समाजातील शेवटच्या घटकाची प्रगती व्हावी या उद्देशाने त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. ई – श्रम कार्डची आतापर्यंत 68 लाख असंघटीत कामगारांची नोंद करण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्यांच्या वारसाला केंद्र शासनाच्या मार्फत देण्यात येणार आहेत. ग्रामिण भागातील जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी असे आवाहन भंडारी यांनी केले आहे. पीएम किसान योजना, जनधन योजनेअंतर्गत भारतातील 33 कोटी लोकांनी बँकेत खाती उघडली आहेत. आयुष्यात कधीही बँक बघितली नाही अशा गरीब लोकांनी बँकेत बचत करायला सुरुवात केली आहे. वैभववाडी तालुका भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन ही योजना वैभववाडी तालुक्यातील राबविली आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन भंडारी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा कंपनीचे सदस्य राजू पवार यांनी मानले.

You cannot copy content of this page