*⚡सावंतवाडी ता.०६-:* वेत्ये येथील कलेश्वर मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक ७ ऑक्टोंबर पासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दशावतारी नाटक, फुगडी, दांडिया अशा विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. यावेळी भाविकांनी कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून दर्शन आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री कलेश्वर नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्ष गुणाजी गावडे यांनी केले आहे.
वेत्ये येथील कलेश्वर मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
