सावंतवाडीतील शिवप्रेमी कडून शहरात दुर्गामाता दौंडीचे आयोजन

युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन

सावंतवाडी ता.-:सावंतवाडी शहरात या वर्षी देखील सावंतवाडीतील शिवप्रेमीकडून दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले असून, घटस्थापना ते विजयादशमी म्हणजेच दिनांक ७ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोंबर दरम्यान या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी उभाबाजार येथील शिव तिर्थावरून सकाळी ६.०० वाजता ही दौड सुरू होणार आहे. या दुर्गामाता दौंड मध्ये शहरातील तरुण युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शहरातील शिवप्रेमी कडून करण्यात आले आहे. यावेळी अधिक माहितीसाठी शुभम घावरे 7768904916, कृष्णा धुळपनवर 9075723512 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सुमित नलावडे, शुभम घावरे, कृष्णा धुळपनवर, स्वप्नील यादव, आकाश खिलारे, एकनाथ जाधव, विनय वाडकर आदी युवक उपस्थित होते.

You cannot copy content of this page