*⚡वैभववाडी ता.०५-:* वैभववाडी शहरातील गुरव कॉम्प्लेक्स येथील बंद फ्लॅटच्या बेडरुमचे लॉक तोडून सुमारे दीड लाखाची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत असलेल्या राजू विलास मोहिते व सचिन तुकाराम चव्हाण यांना येथील सह दिवाणी व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती डी . ए . पाटील यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला आहे . संशयितांच्यावतीने अॅड . उमेश सावंत व अॅड . भूषण बिसुरे यांनी काम पाहिले. सुमिता सुधाकर पावसकर या शहरातीलच मच्छीमार्केट येथे राहणारे जुन्या एसटी स्थानकानजीक त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून फुले , नारळ व कि कडधान्य विक्रीचे दुकान आहे . व्यवसायातून मालाची विक्री करून जमा झाले लाख ५० हजार रुपये त्यांनी आपल्या फ्लॅटच्या बेडरुममधील स्टीलच्या ठेवले होते . ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुमिता यांच्या आई संगिता यांनी बेडरुमला कुलूप लावले . मात्र , हॉलला कुलूप न लावताच त्या दुकानात गेल्या काही वेळाने त्यांच्याकडे एक व्यापारी दुकान साहित्याचे शिल्लक पैसे नेण्यासाठी आला . त्यावेळी आई संगिता या पैसे आणण्यासाठी फ्लॅटमध्ये गेल्या असता त्यांना कुलूप लावलेला बेडरुमचा दरवाजा उघडा दिसला . त्यांनी बेडरुममध्ये जात स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले पैसे तपासले असता त्यांना डब्यात पैसे नसल्याचे निदर्शनास आले होते . या चोरी प्रकरणात त्यांच्याकडे मजूर म्हणून कामास असलेल्या दोघांची नावे त्यांनी संशयित म्हणून पोलिसांना दिली होती . त्यांच्यावर भादंवि कलम ३८० व ४५४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती . त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली . यावेळी त्यांच्यावतीने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणीअंती न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना आठड्यातून एकदा पोलीस स्टेशनला हजेरी लावणे , तपासात ढवळाढवळ न करणे , तपासात सहकार्य करणे , अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा न करण्याच्या अटी घातल्या आहेत .
वैभववाडीतील फ्लॅटमधील दीड लाखाची रोकड चोरीप्रकरणी दोघांना जामीन
