कळसुली मुख्य मार्गावरील रस्त्यावर झाडीचे साम्राज्य

दुतर्फा झाडी तोडून रस्ता निर्धोक करण्याची अतुल दळवी मागणी

*⚡कणकवली ता.०५-:* कणकवली तालुक्यातील कळसुली मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी आणि अपघाताला आमंत्रण देणारी झाडी तोडून रस्ता निर्धोक बनवावा, अशी मागणी कळसुली माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.सदस्य अतुल दळवी यांनी केली आहे. कळसुली शिवडावं फाटा ते कळसुली पुनर्वसन पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा झाडी व पडलेले खड्ड्याकडे संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी या कळसुली गावातील रस्त्याकडे निदान एकदा तरी फेरी मारावी आणि रस्त्याची झालेली दुर्दशा पाहावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. कळसुली पोस्ट ऑफिस नजीक शाळकरी विद्यार्थी ची मोठी वर्दळ असते, या मोरी दरम्यान दुतर्फा झाडी वाढली असून नवख्या वाहनचालकाना वळणांवर पुढील वाहनांचा अंदाज येत नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडी अभावी अपघाताची मालिका सुरू आहे आहे. मोठी दुर्घटना घडल्यास बांधकाम विभाग जबाबदार आहे? या सगळ्या बाबींचा विचार करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावा आणि आठवडाभरात तो रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक बनवावा अन्यथा आम्हाला ग्रामस्थांना सोबत घेवून आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा इशाराही दळवी यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page