मातोश्री कला क्रीडा मंडळाकडून दाभोली नाका येथे नवरात्रोत्सवाचे आयोज

*⚡वेंगुर्ला ता.०५-:* मातोश्री कला क्रिडा मंडळातर्फे दाभोली नाका येथे प्रतिवर्षाप्रमाणे ७ ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि.७ रोजी दुर्गामातेचे पूजन, रात्रौ.८.३० सांस्कृतिक कार्यक्रम, दि.८ रोजी रात्रौ ८.३० वा. दशावतारी नाटक, दि.९ रोजी रात्रौ ८ वा. ५ ते ८ व ९ ते १२ वर्षे वयोगटासाठी फॅन्सीड्रेस स्पर्धा, दि.१० रोजी रात्रौ ८ वा.सांस्कृतिक कार्यक्रम, दि.११ रोजी रात्रौ ८ वा. रेकॉर्ड डान्स, दि.१२ रोजी रात्रौ ८ वा. फुगडी महोत्सव, दि.१३ रोजी रात्रौ ८ वा. दांडिया नृत्य, दि.१४ रोजी सायं.६ वा. बुवा भगवान लोकरे (मुंबई) व बुवा प्रमोद हर्याण (मुंबई) यांचा डबलबारी भजनाचा जंगी धमाका, दि.१५ रोजी सायं.५ वा. दाभोली नाका -पिराचा दर्गा-श्रीराम मंदिर मार्ग-गाडीअड्डा नाका-बाजारपेठ – जुने बस स्थानक मार्गे मांडवी खाडी येथे दुर्गामातेचे विसर्जन. नवरात्रौत्सव कालावधीत रोज संध्या. ६.३० वा. भजन व सार्वजनिक आरती होणार आहे. या नवरात्रौत्सवासाठी उत्सव समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष-विलास गावडे, उपाध्यक्ष-तन्मय जोशी, सचिव-बाबली वायंगणकर, खजिनदार-दादा केळुसकर आदींचा समावेश आहे. समिती निवड बैठकीवेळी दादा कुबल, वसंत तांडेल, संदेश निकम, जयंत मोंडकर, श्रीकांत रानडे, सुनिल मांजरेकर, प्रभाकर आजगांवकर, भूषण आंगचेकर, तुषार साळगांवकर, भूषण सारंग, प्रफुल्ल प्रभू, अविनाश सडवेलकर, छोटू कुबल, श्याम नाडकर्णी, प्रमोद वेर्णेकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page