महामार्गावरील हळवल फाटा येथे अपघात;

दोन कारची समोरासमोर धडक

*⚡कणकवली ता.०५-:* कणकवलीहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला कसालहुन येणाऱ्या बलेरोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला सकाळी 6 च्या सुमारास हा मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे अपघात झाला असून या अपघातात प्रवाशांना दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते आहे हा अपघात गडनदी ब्रिजजवळील हळवल फाट्यावर झाला असून डायवर्षणच चा अंदास न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती समजताच महामार्ग वाहतूक पोलिस तातडीने दाखल होत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली

You cannot copy content of this page