माणगाव खोऱ्यातील व्यवसायिकांना समृध्द करण्यासाठी पोल्ट्री व्यवसायात विविध प्रकल्प राबविणार…

भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले मत

*⚡कुडाळ ता.०४-:* माणगाव खोऱ्यातील व्यवसायिकांना समृध्द करण्यासाठी पोल्ट्री व्यवसायात स्लॉटर हाऊस, हॅचरीज सारखे विविध प्रकल्प राबविणार असल्याचे मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, या व्यवसायासाठी आवश्यक असणारे कर्ज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे याचा फायदा येथील तरुण युवकांना होणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page