कमलाताई परुळेकर यांचे आवाहन
मालवण (प्रतिनिधी) महात्मा गांधी व शास्त्री यांच्या विचाराचा वारसा बॅ नाथ पै यानी अखेरपर्यंत जपला व संसदेची प्रतिष्ठा प्राणपणाने जपले, त्यांची स्मृति सर्वानी जपावी असे आवाहन कमलाताई परुळेकर यांनी येथे बोलताना केले बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखा येथे बॅ. नाथ पै जन्मशताब्दी निमित्त शिक्षण निधी वितरण व रानभाजी पाककला स्पर्धेचा बक्षीस वितरण ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर बॅ नाथ पै सेवांगण कट्टाचे अध्यक्ष किशोर शिरोडकर, सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, बाळकृष्ण नांदोसकर, दीपक पावसकर, डॉ सोमनाथ परब, बापू तळवडेकर, श्याम माळवदे, वैष्णवी लाड, सुजाता पावसकर, संपदा भाट आदी उपस्थित होते यावेळी किशोर शिरोडकर यानी बॅ नाथ पै यांचे लोकशाही समाजवादासाठीचे योगदान विविध दाखल्यातून समजावून सांगितले. तर वैष्णवी लाड यानी मुलानी शिक्षण निधीचा वापर गुणवत्ता वाढवण्यासाठी करण्याचे आवाहन केले. दीपक भोगटे यानी वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी कट्टा व मसुरे परिसरातील ४० विद्यार्थ्याना शिक्षण निधीचे व रानभाजी पाककला स्पर्धेतील विजेत्याना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कु. शार्दूल रेवडेकर याने केलेली महात्मा गांधींची वेशभूषा लक्षवेधी ठरली कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळकृष्ण नांदोसकर यानी केले. या कार्यक्रमास शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते. *रानभाजी पाककला स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे-* प्रथम- समृध्दी संतोष गिरकर, द्वितीय – सायली वितेंद्र बोडये, तृतीय- उज्वला रघुनाथ गुराम, योगिता बाळकृष्ण चव्हाण, विजया विजय वराडकर, सुविधा वासुदेव मलये, चतुर्थ- दीक्षा देवदास रेवडेकर, प्रियांका लवु वाईरकर, हर्षदा राजेंद्र पराडकर, दीव्या दिनेश वाईरकर, उत्तेजनार्थ- रुपाली मोहन मांजरेकर, हर्षदा हरिश्चंद्र गावडे, श्वेता शिवराम गावडे, नेहा सुभाष मांजरेकर, स्वाती गुरुनाथ पोखरणकर, समिक्षा मोहन हडकर. या स्पर्धेचे परीक्षण छाया पेणकर व प्रियांका भोगटे यानी केले.
