मालवण (प्रतिनिधी) दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने भगवंतगड किल्ला येथे श्रमदानाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आचरा येथील यशराज प्रेरणा या संघटनेच्या सदस्यांनी सुद्धा श्रमदानात सहकार्य केले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे सहना प्रभुदेसाई, चेतन घोणे, चैतन्य आरेकर, तेजस पाडावे, संकेत सुभाष परब, भगवंतगड श्रमदान प्रमुख राज सचिन मालोंडकर, यशवंत शिवराम राणे, भास्कर साईनाथ चिंदरकर, सुमेध जाधव यांच्या सह यशराज प्रेरणा ग्रुप अध्यक्ष मंदार रामचंद्र सरजोशी, उपाध्यक्ष ऍड. सायली आचरेकर, कार्यवाह मीनल उज्वल कोदे, धनश्री रामदास आचरेकर, सर्पमित्र स्वप्निल सूर्यकांत गोसावी, नितान विश्राम कुबल, पराग कुबल, सौ वर्षा मांगिरीश सांबारी, वेदांत मांगिरीश सांबारी, हरेश पडवळ आदी सहभागी झाले होते.
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून भगवंतगड येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम
