गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांचे आश्वासन;सतीश सावंत यांनी साधला संवाद
*⚡कणकवली ता.०२-:* गोकुळ जिल्हा सहकारी दूध संघाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आमचे नेहमी सहकार्य राहील कुठलीही अडचण आल्यास आम्ही नेहमी आपल्याला सहकार्य करू कारण अडचणीच्या काळात गोकुळ संस्थेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहकार्य केले आहे .त्यामुळे आपण सुचवलेल्या पर्यायाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून आपल्याला वेळोवेळी सहकार्य करू असे आश्वासन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादन संघाचे एम. के. गावडे यांच्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादन संघाचे एम. के. गावडे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ गोकुळ संस्थेस भेट दिली. यावेळी गोकुळ संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील व एमडी श्री. घाणेकर यांनी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी गोकुळच्या संचालक मंडळ यांच्या समोर मांडल्या. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन वाढण्यासाठी गोकुळने आम्हाला वेळोवेळी मदत करावी जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 20 हजार लिटर दूध मिळू शकेल तसेच सिंधुदुर्ग दूध उत्पादन संघाचे चेअरमन एम. के. गावडे यांनी देखील शेतकऱ्यांना फायदा होऊन दूध उत्पन्न वाढल्यास याचा फायदा आपल्या गोकुळ संस्थेस होईल असे सांगितले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पन्न वाढीसाठी कोल्हापूर गोकुळ दूध उत्पादन संघ यांनी पुढाकार घेतला आहे .सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा दूध उत्पादन संघाचे चेअरमन एम.के. गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघ गोकुळ येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीत जिल्ह्यातील दूध उत्पन्न कसे वाढेल व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल यासंबंधी चर्चा करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या उत्तम दर्जाच्या म्हशी उपलब्ध व्हाव्यात तसेच चारा मुबलक मिळावा व दूध संकलनासाठी ही उपाययोजना व्हावी या संदर्भात वेगवेगळ्या मुद्द्यांवर गोकुळच्या मुख्य कार्यालयात चर्चा करण्यात आली. यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले प्रकाश पाटील, शशिकांत पाटील व सिंधुदुर्ग जिल्हा दूध संस्था प्रतिनिधी टिपु सावंत (आब्रड) ,आप्पा देसाई (दोडामार्ग ),पिंटू सावंत (फोंडाघाट), सुरेश हरम (किंजवडे), नारायण गावडे (बांदा), ज्ञानेश्वर परब (मडूरा),विश्वास सावंत (कासरल), श्रीकांत राणे (वाघेरी), शांताराम रावराणे (लोरे) ,जयवंतराव रावराणे (लोरे), मुकुंद सरनोबत (माणगाव), सुनील पालकर (सुकळवाड) ,दीपक गावडे (पेंडुर), पांडूरंग ठाकुर (मसुरे) व बँक कर्मचारी उदय तावडे व मंदार चव्हाण उपस्थित होते.
