सेवादल व युवक काँग्रेस तर्फे मालवणात स्वच्छता मोहीम

*⚡मालवण ता.०२-:* राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस सेवादल आणि युवक काँग्रेसच्यावतीने मालवण दांडी समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेस सेवादल आणि युवक काँग्रेसच्यावतीने आज मालवणात गांधी जंयती साजरी करण्यात आली. यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, माजी तालुका अध्यक्ष महेश अंधारी, शहर उपाध्यक्ष सरदार ताजर, मालवण सेवादल अध्यक्ष चंदन पांगे, दिलीप तळगांवकर मेधशाम लुडबे, वाईरकर रापण संघांचे पदाधिकारी, युवक काँग्रेसच्या पल्लवी तारी, देवानंद लुडबे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page