*⚡मालवण ता.०१-:* कणकवली येथील युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्च २०२० STS परीक्षेत कु. यशश्री ताम्हणकर हिने यश मिळविले. पारितोषिक वितरण समारंभात यशश्री हिला राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. रावजी परब यांच्या हस्ते सन्मानपत्र, रोख रक्कम व बक्षिस देऊन गौरवण्यात आले. मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे जि. प. अध्यक्षा सौ. संजना संदेश सावंत, माजी अध्यक्ष जि प सिंधुदुर्ग संदेश सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री गणेश जेठे, सभापती श्री मनोज रावराणे, श्री भाई चव्हाण, श्री निलेश सामंत यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यशश्रीला श्री गुरुनाथ ताम्हणकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले. यशश्री हीने मिळविलेल्या या यशाबद्दल मसुरे नं. १ केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शर्वरी शिवराज सावंत, केंद्रप्रमुख श्री नारायण देशमुख, शा. व्या, स. अध्यक्ष श्री. सन्मेश मसुरेकर, माजी अध्यक्ष श्री दत्तप्रसाद पेडणेकर पदवीधर शिक्षक श्री विनोद कदम श्री विनोद सातार्डेकर , श्री. गुरुनाथ ताम्हणकर, श्री. गोपाळ गावडे, सौ. रामेश्वरी मगर , शा. व्य. समिती, शिक्षक पालक संघ यांनी कौतुक केले.
यशश्री ताम्हणकर हिचे टॅलेंट सर्च परीक्षेत यश
