भारतबंदला जिल्हा काँगेसचा पाठिंबा

केंद्र सरकारचा केला निषेध

*⚡सावंतवाडी ता.२७-:* भारतातील शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या २७ सप्टेंबरच्या भारत बंदला जिल्हा काँग्रेस कडून जाहीर पाठिंबा देत. केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.यावेळी केंद्र सरकारने केलेले तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, शहर अध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, कौस्तुभ गवडे विभावरी सुकी सच्चिदानंद फुगडे,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page