आजगाव बीएसएनएल टॉवर चे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये- सरपंच सुप्रिया वाडकर ..

*⚡सावंतवाडी ता.२७-:* येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये आजगाव येथे होत असलेला बीएसएनएलचा टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते त्याचे विधीवत उद्घाटन होईल. अशी माहिती आजगाव सरपंच सुप्रिया वाडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. आजगाव येथे बीएसएनएल टॉवर कार्यान्वित व्हावा यासाठी खासदार विनायक राऊत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच ग्रामपंचायत आजगाव आणि सरपंच व सर्व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते अंकित आजगावकर, युवासेना उपजिल्हाधिकारी श्री सागर नाणोसकर, रामा रेवाडकर , एकनाथ आरोलकर, श्रीधर आरोलकर तसेच समस्त आजगावकर ग्रामस्थ यांनीही वेळोवेळी बीएसएनएल टॉवर व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आजगाव येथे बीएसएनएल टॉवर कार्यान्वित होणार आहे. त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न उगाचच इतरांनी करू नये, असा टोला देखील आजगाव सरपंच सौ सुप्रिया वाडकर यांनी विरोधकांना प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे.

You cannot copy content of this page