स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्षीही धनगरवाडी मूलभूत सेवेपासून वंचित

राजापूर तालुक्यातील ताम्हणे येथील स्थिती

वैभववाडी प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा,राजापूर तालुक्यातील ताम्हणे धनगरवाडी विकासाच्या मुलभुत सुविधांपासून वंचित असुन स्वातंत्र्यांच्या ७४ वर्षानंतरही आजारी रूग्णांना डोलिचा आधार घ्यावा लागत आहे. ताम्हणे धनगरवाडीच्या या गंभिर विषयाकडे स्थानिक लोकप्रतिनीधी व प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी तर्फे सोशलमिडीयावर बातमी प्रसारीत करण्यात आली.या बातमीची सर्वप्रथम जिल्हा नांदेड चे नागरीक असलेले *समाजनेते डॉ.यशपाल भिंगे यांनी शनिवारी घेऊन रोजी ५ कि.मि पायपीट करून प्रत्यक्ष ताम्हणे धनगरवाडीतील समाजबांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या. ताम्हणे धनगरवाडीची मुख्य अडचण रस्ता व पाण्याची आसल्याचे बहुतांश स्थानिक नागरीकांनी सांगितले.मा.डॉ.यशपाल भिंगे साहेबांनी सर्व समाज बंधू/भगिनींच्या व्यथा शांतपणे ऐकून घेतल्यानंतर ताम्हणे धनगरवाडी व इतर राजापूर विधानसभा कार्यक्षेत्रातील धनगरवाड्यांच्या विकासात्मक अडीअडचणी सोडविण्यासाठी वरीष्ठ पातळीवर मा.उपमुख्यमंत्री महोदय यांच्या बरोबर बैठक आयोजित करण्याचा शब्द दिला तसेच समाजाचे आराध्य दैवत खंडोबाच्या कृपेने विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळाल्यास पहिला आमदार फंड* ताम्हणे धनगरवाडीला देण्याचे वचन उपस्थित समाजबांधवांना दिले. डॉ.यशपाल भिंगे साहेबांनी थोडक्यात प्रभावी विचार मांडले.त्यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन ताम्हणे धनगरवाडीतील नागरीकांमध्ये अन्यायाविरूध्द लढण्याचे नवचैतन्य निर्माण झाले आहे.राजापूर तालुक्यातील विविध भागांतून समाज कार्यकर्ते या पहाणी दौ-यात सहभागी झाले होते. डॉ.यशपाल भिंगे यांचा ताम्हणे धनगरवाडीचा दौरा यशस्वीकरण्यासाठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी या संघटनेचे कार्यकर्ते गणपत पटकारे* रामचंद्र झोरे,राजनजी बोडेकर,सुनिल झोरे यांनी विशेष सहकार्य केले.

You cannot copy content of this page