९ टक्के व्याजाने मिळणार कर्ज; जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती
*⚡सावंतवाडी ता.२६-: :* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने महाराष्ट्रातील ऐतिहासिक निर्णय घेतला असून शेतकऱ्यांचा मुलांसाठी, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळी, आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा होती. या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना बळीराजा शैक्षणिक कर्ज योजना ९ टक्के दराने दिल जात, त्या मुलांनी व्यावसायिक अभ्यासक्रमात जर विशेष श्रेणी प्राप्त केली तर त्यांना १०० टक्के व्याजाचा परतावा मिळेल. तर प्रथम श्रेणी प्राप्त केल्यास ७५ टक्के, द्वितीय श्रेणी प्राप्त केल्यास ५० टक्के व्याजाचा परतावा मिळेल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सतिश सावंत यांनी दिली
तर यामध्ये शेतकरी कोणत्याही सोसायटीचे सभासद असणं, जमिन पडीक असता नये, सातबारावर पीक पाण्याची नोंद आवश्यक असणारं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल शिक्षण मिळाल तर त्यांच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळतील आणि शेतकरी आर्थिक सक्षम होईल. या दृष्टिकोनातून ‘बळीराजा प्लस शैक्षणिक कर्ज योजना’ ही योजना नव्यानं चालू केली असून यामध्ये शेतकऱ्यांची मुलं मेरीटमध्ये पास झाल्यास त्याचा फायदा त्यांनी भरलेल्या व्याजाचा परताव्यासाठी होणार आहे. याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले. यावेळी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डाॅंटस, कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
