*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवारी दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून मोटारीने ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत पुरविण्यात आलेल्या रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग. सकाळी 10.30 वाजता कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी 11.00 वाजता ओरोस येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता चिपी येथे आगमन व चिपी विमानतळ आढावा बैठक, स्थळ- चिपी विमानतळ ता. वेंगुर्ला. दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद, स्थळ- चिपी विमानतळ ता. वेंगुर्ला. दुपारी 2.00 वाजता चिपी विमानतळ येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.
पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
