मडुऱ्यात किसान सन्मान योजनेत घोळ

गावाबाहेरील व्यक्तींची गावच्या यादीत नावे : चौकशी करण्याची तात्या माधव यांची मागणी

*⚡बांदा ता.२०-:* केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला अधिकाऱ्यांकडूनच हरताळ फासण्याच्या घटना घडत आहेत.मडुरा गावात एकही मुसलमान वस्ती नसून तब्बल शंभरहून अधिक नावे गावातील शेतकरी असल्याचे सन्मान योजनेच्या यादीत दिसून आले. सदर लाभार्थ्यांचा निधी कोणत्या बँकेच्या खात्यात जमा झाला? बोगस लाभार्थी यादी मंजूर करण्यामागे कोणते अधिकारी आहेत? याची माहिती आठ दिवसांत मिळावी. बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळेच आज हजारो शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असल्याने बोगस तुपाशी तर लाभार्थी उपाशी अशी म्हणण्याची वेळ आली आहे. येत्या आठ दिवसांत पुन्हा यादीची तपासणी करून सदर बोगस लाभार्थी मडुरा गावाच्या यादीतून वगळावे, अशी मागणी भाजपा सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत ऊर्फ तात्या माधव यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना दिला आहे. तसे लेखी निवेदनही सावंतवाडी तहसीलदार यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page