भाजपतर्फे फातिमा कॉन्व्हेंटमधील मुलांना साहित्य वाटप

*⚡मालवण ता.२०-:* भाजपचे नेते माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका भाजपच्या वतीने मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंट मधील ४० मुलांना दैनंदिन जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, महेश मांजरेकर, बाबा परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, बबलू राऊत, जॉमी ब्रिटो, नंदू देसाई, मोहन वराडकर, भाऊ सामंत, बाळू मालवणकर यासह कॉन्व्हेंट मधील सिस्टर उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page