तर..तौक्ते चक्रीवादळातील महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान;भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचा उपक्रम
*⚡वेंगुर्ले ता.२०-:* भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व सतर्क पोलीस टाईम्स च्या संयुक्त विद्यमाने रेडी, शिरोडा व आरवली शाळेतील माध्यमिक शालांत परीक्षेत उच्चतम गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना “गौरव प्रशस्तीपत्र” देवून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोना काळात तसेच तौक्ते चक्रीवादळात रेडी, शिरोडा आरवली व आजगाव येथील महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी खंडित झालेला विद्युत प्रवाह तात्काळ सुरू करून ग्रामस्थांना जो दिलासा दिला त्याकरिता संस्थेच्या वतीने त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा “कोरोना योद्धा” सन्मानपत्र देवून गौरविण्यात आला. शिरोडा येथील कोकण रत्न हॉल येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात संस्थेचे कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाचे प्रविण भगत, राजेश सातोसकर, राजाराम चिपकर, विश्वास नरसुळे, मुरलीधर राऊळ व रविंद्र राणे हे उपस्थित होते.
