खास. विनायक राऊत यांनी चष्मा बदलावा म्हणजे केंद्र सरकारने दिलेला निधी व विकास दिसेल

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा टोला;राज्य सरकारने एक रुपया तरी दिला का?

*⚡कणकवली ता.१८-:* दोन वर्षांत राज्याला केंद्राकडून पैसे आले नाहीत असे म्हणणारे खास.विनायक राऊत कोणत्या चष्म्यातून बघतात ते समजत नाही. आतापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून ७७ टक्के लसीकरण पूर्ण झाले.८० हजार कोटी लोकांना करोडो रुपये खर्च करुन केंद्र सरकार मोफत धान्य देत आहे. देशात ६० लक्ष कोटी कोरोना कालावधीत केंद्र सरकारचा खर्च झाला.मात्र,खा.राऊत यांना प्रश्न आहे,आपल्या माध्यमातून किंवा राज्य सरकारने एक रुपया तरी दिला का?असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली बोलत होते. प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल वाढदिवस, त्यामुळे जागतिक पातळीवर विक्रम करत २.५ कोटी लसीकरण करण्यात आले. मुबंई गोवा महामार्ग कोणी केला,ना.नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हा चौपदरीकरण झाला आहे.ग्रामपंचायतला १४ वित्त आयोगाला निधी कोण देतय? केंद्र सरकार मग आपण काय करता?पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्यास राज्य सरकारने विरोध केला,असा आरोप राजन तेली यांनी केला.केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला, व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा काम केलं. पण राज्य सरकारने या कोरोनाच्या काळात कोणती भूमिका बजावली?राज्याने लसींसाठी ७ हजार कोटींचा चेक लिहला तो कुठे गेला?त्याची पोलीस तक्रार करावी लागेल. रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील रस्त्यांची अगदी चाळण झालीय. तौत्के चक्रीवादळावेळी केंद्र शासनाने मदत केल्यानंतर राज्य सरकार जाग झाले.तुम्ही काय केलात?रस्ते खड्डेमय झाले आहेत.प्रमुख रस्त्यांवरील दुर्दशा झाली आहे,तुमचे सरकार काय करते?विमानतळ श्रेय नारायण राणेंचेच आहे.तुम्ही विमानतळावर जाणारा रस्ता करु शकला नाही,पाण्याची व्यवस्था कोण करणार?विद्युतीकरण कुठे आहे?बेरोजगार तरुणांचे अर्ज घेतलात त्याचे काय झाले?ते धुळखात पडले आहेत.त्यांच्यावर जरा राऊत यांनी लक्ष घालावे. विकासाला चालना ना. राणेंनी दिली आहे.आपला जिल्हा विकासाला चालना मिळेल.राणेंचे खाते आहे,त्यातून बंद उद्योग आहेत,त्यांना चालू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.त्याच्या खात्याच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न मार्गी लागतील,असा विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला. आमच्यावर टीका करण्यापूर्वी आपण काय केलात ते एकदा तरी सागा.आरोग्य भरतीत काय अवस्था आहे हे पहा?कोविड काळात नेमलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढून राज्य सरकारने त्यांना निर्दयीपणे वागविले.त्याला कोण जबाबदार असा सवाल राजन तेली यांनी केला.नारायण राणेंना मिळालेलं केंद्रीय उद्योग मंत्री पद कोकणवासीयांसाठी फायद्याचे आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात चांगल्या प्रकारचे रोजगार निर्माण होतील. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात जे छोटेमोठे व्यवसाय उभे राहिलेले आहेत, त्यांना आपल्या खात्याच्या मार्फत पुनर्जीवित करण्यासाठी काय करता येईल, यावर विचार करण्याची मागणी आम्ही नारायण राणेंकडे केलेली आहे. नाणार, सी-वर्ल्ड अशा विकास प्रकल्पांना शिवसेनेने कायम विरोध केला आहे. त्यामुळे नुसती बोंब मारण्यापेक्षा आपल्या राज्य सरकारने काय दिलंय, ते बघा. नुसती टीका करण्यापेक्षा राज्य सरकारची कामे सांगा, असा पलटवार राजन तेली यांनी विनायक राऊत यांच्यावर केला आहे.

You cannot copy content of this page